जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
व्हाट्सॲप बिझनेस ब्रॉडकास्ट मेसेजिंग आता पूर्वीप्रमाणे मोफत राहिलेले नाही. ब्रॉडकास्ट केलेल्या प्रत्येक मेसेजसाठी आता प्रत्येक व्यक्तीमागे ठराविक चार्जेस द्यावे लागणार असल्याने आम्ही ब्रॉडकास्ट मेसेज द्वारे जॉब नोटिफिकेशन्स पाठवणे बंद केले आहे. या ऐवजी १ जानेवारी २०२६ पासून आम्ही व्हाट्सॲप चॅनल्स व्दारे जॉब नोटिफिकेशन्स पब्लिश करण्यास सुरुवात केली आहे. आपले नाव, मोबाईल नंबर आणि वैयक्तिक डिटेल्स शेअर न करता आपण सुरक्षितपणे चॅनल्स फॉलो करू शकता. व्हाट्सॲप चॅनलवर जॉब अपडेट्स पब्लिश झाल्यावर लगेच आपल्याला व्हाट्सअप नोटिफिकेशन येईल आणि आपण त्वरित जाहिरातदारांशी संपर्क साधू शकाल.
व्हाट्सॲप चॅनल्स फॉलो करण्यासाठी आणि जाहिरातींचे नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
या पेजवर सर्वात शेवटी व्हाट्सॲप चॅनलच्या लिंक्स दिल्या आहेत. त्यातील चॅनेलच्या लिंकवर टॅप करा. तुमच्या मोबाईलमधील व्हाट्सॲपमध्ये ते चॅनल ओपन होईल. स्क्रीनच्या बॉटमला Follow Channel बटनवर क्लिक करा.

चॅनल फॉलो केल्यानंतर स्क्रीनमध्ये वरच्या बाजूला उजव्या कॉर्नरला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा. यामुळे चॅनलवर जॉब अपडेट पब्लिश केल्यावर लगेच आपल्याला व्हाट्सॲप नोटिफिकेशन येईल.

फॉलो केलेले चॅनल व्हाट्सऍप स्टेटस च्या खाली दिसेल.

Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती