वेबसाईटचा वापर App प्रमाणे करणे

Proper Pune वेबसाईटचा वापर मोबाईल app प्रमाणे करता येईल पुढील दोन स्टेप्स पूर्ण करा.

स्टेप १

  • मोबाईल फोनमधील Chrome Browser मध्ये वेबसाईट ओपन करा. 
  • तुमचे अकाउंट लॉगिन असेल तर प्रथम ते लॉग आऊट करा. 
  • ब्राऊजर मध्ये सर्वात वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा. 

आलेल्या मेनूमध्ये Add to home screen हे ऑप्शन सिलेक्ट करा. 

त्यानंतर Install App या नावाची विंडो ओपन होईल. त्यातील Install हे ऑप्शन सिलेक्ट करा.

यामुळे Proper Pune वेबसाईटचा शॉर्टकट तुमच्या home screen वर तयार केला जाईल. तुम्ही इन्स्टॉल केलेल्या इतर apps च्या लिस्टमध्येही हा शॉर्टकट तुम्हाला दिसेल.

हा शॉर्टकट इतर ऍप्स प्रमाणे तुम्ही हव्या त्या ठिकाणी move करू शकता. या  शॉर्टकटवर क्लिक करून वेबसाईट ओपन करा. वेबसाईट आता एका ऍप प्रमाणे ओपन होईल. तुम्हाला आता नेहमीप्रमाणे क्रोम ब्राऊजर ओपन करून त्यात वेबसाईटचे नाव टाईप करण्याची आवश्यकता नाही.

स्टेप २

अकाउंट लॉगिन करण्यासाठी लॉगिन विंडोमध्ये ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करा. याच विंडोमध्ये Keep me signed in हे ऑप्शन select करा आणि लॉगिन करा.

त्यानंतर पासवर्ड सेव्ह करण्याविषयी विचारले जाईल. इथे Save हे ऑप्शन सिलेक्ट करा. 

तुमचे युजरनेम आणि पासवर्ड क्रोम ब्राऊजरमध्ये सेव्ह केले जाईल. यामुळे आता प्रत्येक वेळी युजरनेम आणि पासवर्ड एंटर करावा लागणार नाही. पुढील वेळी वेबसाईट ओपन करण्यासाठी home screen वरील Proper Pune च्या शॉर्टकटवर क्लिक करा. वेबसाईट एखाद्या ऍप प्रमाणे ओपन होईल. तुमचे लॉगिन डिटेल्स क्रोम मध्ये सेव्ह केलेले असल्यामुळे तुमचे अकाऊंट ऑटोमॅटिकली लॉगिन होईल.

विशेष सूचना:  वेबसाईटचा शॉर्टकट होम स्क्रीनवर तयार करताना कोणतेही नवीन ऍप अथवा असुरक्षित apk फाईल तुमच्या मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल केली जात नाही.  त्या वेबसाईटचा फक्त एक शॉर्टकट मोबाईल फोनमध्ये तयार केला जातो. वारंवार वापरल्या जाणाऱ्या वेबसाईटस् त्वरित आणि सुलभतेने वापरता याव्यात यासाठी क्रोम ब्राऊजरमध्ये दिलेली ही एक विशेष सुविधा आहे. अशा पद्धतीने इतर कोणत्याही वेबसाईटचे शॉर्टकट्स तयार करून त्यांचा वापर तुम्ही app सारखा करू शकता. तुमच्या फोनच्या सुरक्षेला कोणताही धोका या पद्धतीने संभवत नाही.