Dashboard Management

तुम्ही केलेले ऍप्लिकेशन्स, तुमची प्रोफाइल, शॉर्टलिस्ट केलेले जॉब्स आणि तुमचे अकाउंट मॅनेज करण्यासाठी हा डॅशबोर्ड उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा हे समजून घ्या.

सर्वप्रथम तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर वेबसाईट हेडरमध्ये तुमचे नाव दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे अकाउंट manage करण्यासाठीचा मेनू ओपन होईल.

यातील ऑप्शन्स आणि त्यांचे उपयोग खालीलप्रमाणे आहेत.

१: Search Jobs: जॉब सर्च करण्यासाठी अथवा वेबसाईटच्या Home Page वर जाण्यासाठी  Search Job वर क्लिक करा.

२: Dashboard: तुम्ही केलेल्या applications ची संख्या, तुम्ही सेव्ह करून ठेवलेल्या अर्थात तुम्ही shortlist केलेल्या जॉब्सची संख्या, तुमची प्रोफाइल किती employers नी पाहिली आहे याची संख्या अशी विविध माहिती Dashboard मध्ये दिसेल.

अकाउंट मॅनेजमेन्टचे सर्व मेनू पुन्हा पाहण्यासाठी सर्वात वर Show Menu वर क्लिक करा.

३: My Profile: अकाउंट मॅनेजमेंट मधील हा सर्वात महत्वाचा भाग आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुम्ही भरलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. तुम्ही इथे तुमचा बदललेला Mobile number, Qualification, Current Job Title, Work Experience, Skills, Age, Languages, Location या डिटेल्स अपडेट करू शकता. तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि नाव एडिट करता येणार नाही. याच ठिकाणी तुम्ही तुमची प्रोफाइल इमेज आणि CV अपलोड करू शकता.

एखाद्या जॉबसाठी apply केल्यानंतर employer ला तुमचे हेच प्रोफाइल डिटेल्स दिसतील आणि याच्या आधारे employer उमेदवाराच्या योग्यतेबद्दल निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे My Profile मधील तुमची माहिती अचूक आणि अपडेटेड असल्याची खात्री करा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर युजरचे नाव एडिट करता येत नाही. त्यामुळे रजिस्ट्रेशन  फॉर्ममध्ये नाव आणि आडनाव पूर्ण एंटर करा. 

४: Applied Jobs: तुम्ही सबमिट केलेल्या ऍप्लिकेशन्सचे डिटेल्स आणि स्टेटस या ठिकाणी दिसेल. कॅन्डीडेटने अप्लाय केल्यावर ते  ऍप्लिकेशन employer ला सबमिट केले जाते. अशा एप्लिकेशनचे स्टेटस Submitted असे दिसेल. तुमचे एप्लिकेशन एम्प्लॉयरने पाहिले असेल आणि पुढील कार्यवाहीसाठी त्यांनी त्यांच्या डॅशबोर्डमध्ये स्टेटस अपडेट केले असेल तर त्याचे स्टेटस In Process असे दिसेल.

जॉब पोस्टसाठी employer ने तुम्हाला शॉर्टलिस्ट केले असेल तर पुढील कार्यवाहीसाठी तुमच्या मोबाईल नंबरवर अथवा ईमेल आयडी वर employer कडून संपर्क साधला जाईल.

५: Shortlisted Jobs: तुमच्यासाठी योग्य असलेला जॉब तुम्ही सेव्ह करू शकता अर्थात बुकमार्क करून ठेवू शकता. यासाठी Shortlist Job बटनवर क्लिक करा. शॉर्टलिस्ट केलेल्या जॉब्सची लिस्ट Shortlisted Jobs मध्ये पाहता येतील.

६: Change Password: तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्यासाठी या मेनूचा वापर करा.

७: Logout: अकाउंट लॉगऑऊट करण्यासाठी या मेनूचा वापर करा.

८: Delete Profile: तुमचे अकाउंट आणि प्रोफाइल डिलीट करण्यासाठी या मेनूचा वापर करा. प्रोफाइल डिलीट केल्यानंतर तुमचे अकाउंट, सर्व डिटेल्स आणि डेटा कायमसाठी डिलीट केला जाईल. डिलीट केलेले अकाउंट पून्हा restore करता येणार नाही.